विशालगड दर्गेच्या प्रवेशाद्वारा समोर तोफ उडवणाऱ्या आणि दर्गाह परिसरात तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्यांविरुद्ध एम.आय.एम आक्रमक
सांगली(युवापर्व) : दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी विशालगडावर महाशिवरात्रीच्या निमित्त शेकडोच्या संख्येने जमलेल्या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विशालगडावरील प्रसिद्ध अशी हजरत मलिक रेहान बाबा यांच्या दर्गेच्या प्रवेशद्वारा समोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली आणि कट्टर भूमिका घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी पुढे दर्गेच्या प्रवेशद्वारा समोर एक लोखंडी तोफ सरळ दर्गेच्या दिशेने उडवली. यामुळे दर्गेच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाले आहे. जमावाने दर्गाह परिसरात घराच्या दारांची तोडफोड केली दुकानांचे फलक फाडले असे दहशती कृत्य करून दर्गाह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण केले.
तरी हे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर गुन्हा नोंद झाल असून मोका अंतर्गत यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा अशी मागणी एम.आय.एम पक्षाचे सांगली जिल्हा डॉ महेशकुमार कांबळे यांनी केली.तसेच विशालगडावर जे काही अतिक्रण आहे ते तात्काळ काढावे आणि बेकायदेशीर धंदे चालू आहेत त्यावर प्रशासनाने बंदी घालावी. हजरत मलिक रेहान बाबा यांच्या दर्गेला सुरक्षा द्यावी आणि गडावर जातीवाद निर्माण करणाऱ्या दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणाऱ्या आणि एक विशिष्ट उद्देश घेऊन मुस्लिम समाजाला निशाणा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी एम.आय.एम पक्षा कडून करण्यात आली आहे .
दरम्यान यावेळी AIMIM पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष इम्रान सनदी,सलमान नाईकवाडे,इचलकरंजी कार्याध्यक्ष दिलावर मुल्ला,कुरुंदवाढ शहराध्यक्ष मुज्जमिल मोमीन,रज्जाक शिरगुर,आरमान जमादार,सद्दाम भाई व पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.