सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याकडून जिल्ह्यात अलर्ट जारी
सोलापूर : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांचेकडून हवामान विषय मिळालेल्या पूर्व सुचनेच्या अनुषंगाने सोलापूर जिल्हयात दिनांक ०७ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत जिल्हयात अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची विजा चमकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेला आहे. सदर कालावधीत नागरिकांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांचेमार्फत करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सोलापूर महसूल शाखा- जिल्हा नियंत्रण कक्ष जा.क्र. २०२२/मशा/कार्या- ४ / नैआ/जिनिक/प्र.क्र.८३ /आरआर-२१८० जिल्हा माहिती अधिकारी यांना प्रसिद्धी प्रसारित करण्याचे आदेश दिले आहेत.
- या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.
१. विजा चमकत असताना संगणक, टीव्ही इत्यादी विद्युत उपकरणे बंद ठेवून विद्युत स्रोतांपासून अलग करुन ठेवावीत.
२. दूरध्वनी, भ्रमणध्वनी चा वापर टाळावा.
३. विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
४. विजेच्या खांबांपासून लांब राहावे.
५. विजा चमकत असताना उंच झाडाखाली आश्रयास थांबू नये.
६. विजा चमकत असताना एखाद्या मोकळ्या परिसरात असल्यास, गुडघ्यामध्ये डोके घालून वाकून बसावे.
७. धातूच्या वस्तू दूर ठेवाव्यात.
- सततच्या पडणा-या मुसळधार पावसात पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी.
१. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर जाणे टाळा. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा.
२. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी राहा व पायी अथवा वाहनाने प्रवास करू नका.
३. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची रेल्वेची व रस्ते वाहतूकीची व पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती करून घ्या.
४. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईवर संभाषण करु नये आणि इलेक्ट्रिक वस्तुपासून दुर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा.
५. मुसळधार पावसामुळे उध्दभवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर दूरध्वनी क्रमांक ०२१७- २७३१०१२ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
६. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या
www.imdumumbai.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी.
७. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका व अफवा पसवरू नका.
८. अतिवृष्टी कालावधीत झाडे पडणे. घर किवा इमारत कोसळणे, पूर येणे, दरडी कोसळणे अशा आपत्ती घडण्याची शक्यता असते अशावेळी नागरिकांनी सर्तक राहावे.
९. आपत्कालीन स्थिती उदभवण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जसे दरड प्रवण क्षेत्र या ठिकाणी
आपण राहत असल्यास असल्यास प्रशासनाकडून मिळणा-या सुचनांचे पालन करावे.
१०. पूर प्रवण क्षेत्र व पाणी तुंबण्याची ठिकाणे या ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास त्याबाबत जागरुक राहावे व योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
११. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती पूल इ. ठिकाणी जाऊ नये.
१२. अतिवृष्टी होत असल्यास कोणीही नदी नाले इ. ठिकाणी जाऊ नये.
१३. अतिवृष्टी कालावधीत रस्ते निसरडे बनल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी वाहन चालवताना आवश्यक ती काळजी घेण्यात यावी.
१४. पूराच्या पाण्याजवळ अथवा नदी पात्रात उभे राहून नागरिकांनी सेल्फी काढू नये. आपत्कालीन परिस्थिती सेल्फी काढून नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये.
१५. हवामान विभागाकडून दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी.