आपला जिल्हादेश-विदेशमहाराष्ट्रसमाजकारण

सोलापूर ग्रामीणचे “ऑपरेशन परिवर्तन ” उपक्रम देशपातळीवर ” FICCI ” पुरस्काराने सन्मानित

सोलापूर : सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षका मा.श्रीमती तेजस्वी सातपुते ( भा.पो.से. ) यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा ग्रामीण भागामध्ये अवैध हातभट्टी दारू निर्मीती व विक्री बंद करण्यासाठी ” ऑपरेशन परिवर्तन ” हा अभिनव उपक्रम सप्टेंबर २०२१ पासून राबविण्यात येत आहे . यामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्हातील हातभट्टी निर्मीती व विक्री करणारे महत्वाचे ठिकाणे पोलीस अधिकारी यांना दत्तक देण्यात आली आहेत .सदर उपक्रमांतर्गत आजपावतो ७६३ गुन्ह्यातील ९ १८ आरोपींवर कारवाई करून १,४१,१४,८६२ / – रूपयांचा दारूबंदी गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . तर हातभट्टीचा व्यवसाय करणारे ६ ९ ६ लोकांना कायदेशीर व्यवसायाकडे वळविण्यात आले आहे . यामध्ये शेती , पशुपालन , खाजगी नोकरी , विणकाम , शिलाई काम , हॉटेल या सारखे कायदेशीर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत .

सदर उपक्रमांची देशपातळीवर फेडरेशन ऑफ इंडियन टेंडर ऑफ काॅमर्स एन्ड इंडस्ट्रीज ( FICCI ) यांच्याकडून घेण्यात येवून Smart Policing Award २०२१ मधील सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन परीवर्तन या उपक्रमास पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले आहे . आज दिनांक ०२.० ९ .२०२२ रोजी नवी दिल्ली येथे सदरचा पुरस्कार सोहळा पार पडला . महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिनिधीनी सदरचा पुरस्कार स्विकारला आहे . ऑपरेशन परीवर्तन या उपक्रमामध्ये ८१ पोलीस अधिकारी व त्यांच्या पथकांनी अतिशय कष्ट घेतले आहेत . या उपक्रमास देशपातळीवरील ” FICCI ” अवार्ड मिळाल्याबद्दल श्रीमती तेजस्वी सातपुते , ( भा.पो.से. ) , पोलीस अधीक्षक , सोलापूर ग्रामीण यांनी यामध्ये काम केलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले आहेत .

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button