१२ लाखांच्या गर्दीतून चिमुकल्या अलगद सुखरुप बाहेर काढणारा पोलीस प्रसाद..
मी पोलीस नाईक प्रसाद मनोहर औटी, पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण
आषाढीकार्तिकी विसरूनका मज, सांगतसेगुज पांडुरंग”
आषाढी शुद्ध १० दिवशी सकाळी ०९:०० वा घर सोडले मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, विक्रम कदम साहेब, पंढरपूर विभाग पंढरपूर तसेच मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे, अरुण पवार साहेब, तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत साहेब असे आम्ही व आणखी काही पोलीस अंमलदारांसहित दिवसभर होतो येणाऱ्या सर्व पालख्यांना बंदोबस्त करीत सर्व पालख्या पंढरपूर मध्ये दाखल झाल्या लगेच रात्री मा मुख्यमंत्री बंदोबस्त करायचा होता VIP बंदोबस्त करत करत पहाटे 05:30 वा आणि नामदेव म पायरी येथे व महाद्वारात खूप गर्दी झाल्याचे कळाले आम्ही लगेच श्री संत नामदेव महाराज पायरी येथे गेलो त्या नंतर मी मा.विक्रम कदम साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या सोबत कासार घाटावरून खाली चंद्रभागेत वाळवंटात गेलो असता वरीतल्या त्या गर्दीचा अथांग महासागर लोटला होता आणि जास्तीत जास्त महाद्वार घाटावरून वारकरी भक्त महाद्वाराकडे जात होते अश्या वेळी DYSP मा.कदम साहेबांनी तेथे बांधलेल्या लोखंडी बेरीगेटवर उभे राहून गर्दी आटोक्यात अणण्याचा खूप प्रयत्न केला लोक ऐकत देखील होते तेथे अचानक 1 आजी चक्कर येऊन पडली त्या वेळी साहेबांनी डायरेक्ट उडीच मारली व काही अमलदारांच्या मदतीने तिला बाहेर काढले, त्यानंतर मला तू वरती उभा राहा आणि लोकांना ढकला ढकली करू नका, पर्यायी घाटांचा वापर करा असे सांग असे म्हणतात मी त्या लोखंडी बेरिगेटवर उभा राहून ओरडून ओरडून सांगत होतो त्यांना देवाचा गजर करायला भाग पाडत होतो पण त्या अथांग महासागरात आपला प्रयत्न यशस्वी करण्याची आम्ही जिद्द काय सोडली नव्हती आणि अश्याच वेळी मला एवढ्या गर्दीतून साधारण 6 ते 7 फूट अंतरावरून लहान लेकरू जोर जोरात रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला मला ते रडणं कुठून होतंय तेच सापडत नव्हते नंतर एका स्त्री चा आवाज ऐकू आला आणि ती जोर जोरात ओरडून हंबरडा फोडून सगळयांना मागे सरका ओ, मागे सरका असे सांगत होती, मी चेंगरले साहेब तरी देखील कोणी कोणाचं ऐकत नव्हत आणि अश्यावेळी माझं तिच्या कडे लक्ष गेलं तेव्हा तिचे डोळे पाण्याने भरलेले, जोर जोरात ओरडताना ती जशी तिच्या लेकराला वाचवण्या साठी एखाद्या देवी प्रमाणे दिसतं होती, पण तिच्या हातातल्या लहान लेकराची कोणाला दया येत नव्हती, तेव्हा मी माझ्याकडे असलेली शिट्टी जोर जोरात वाजवत होतो आणि माझ्या पाठीमागे असलेल्या बेरिगेटला आधार म्हणून बांधलेल्या वाश्याला उजव्या हाताने धरून त्या लेकरा प्रर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला परंतु पोहचत नव्हतो मग मी उजवा पाय बेरिगेटवर ठेवला व डावा पाय एका मावशीच्या डोक्यावर असलेल्या पिशवीर ठेवून त्या लेकरांच्या हाताला धरून ओढून बाहेर काढले व त्याला जवळ घेतले नंतर त्याच्या आईला बाहेर काढले त्यावेळचा तो प्रसंग मनाला हलवून टाकणारा होता…
पोलीस खात्यामध्ये काम करीत असताना अथवा इतर ठिकानी काम करीत असताना ऐन वेळी काही प्रसंग घडला तर आपल्या सद सद विवेक बुद्धीला आणि मनाला जे योग्य वाटतंय तेच करणं गरजेचं आहे🙏🙏
“सर्व संकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥”
“याच कामाची परीक्षा घेणार होता देव माझी” 🙏🏻🙏🏻
हा प्रसंग फोटो मध्ये जीवंत उतरवनारे मुंबईतील एका उत्कृष्ट फोटोग्राफर “सूयोग वाजे” यांनी नंतर माझा शोध घेऊन मला पाठवला आहे.
मी आपले खूप खूप आभार मानतो🙏🙏
प्रसाद मनोहर औटी,
पोलीस नाईक
पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण पोलीस