अकलूजच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात ” आय स्पेशालिस्ट ” त्वरीत उपलब्ध करा – जनशक्ती परिवर्तन विकास आघाडी
अकलूज (युवापर्व) : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अकलूज शहर हे दाट लोकसंख्येचे शहर आहे. माळशिरस तालुक्यासह पंचक्रोशीतील अनेक नागरिक हे नेत्र तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे प्रत्येक आठवड्यात ठरलेल्या दिनी तपासणी करता येत असतात. परंतु सदरचे पद १ मार्च २०२४ रोजी रिक्त झालेले असून सध्या रूग्णालयात नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
अकलूज उपजिल्हा रूग्नालयात अद्याप “आय स्पेशालिस्ट ” उपलब्ध नसल्याने रूग्णालय परिसरात ज्येष्ठ नागरिक व महिलांना ताटकळत बसण्याची वेळ ओढवली आहे . सदरच्या रिक्त पद त्वरीत भरण्याबाबत जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीकडून अकलूज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री.गुडे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
तात्काळ हे रिक्त पद भरून नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी या मागणीसाठी मा.जिल्हा शल्य चिकित्सक, सोलापूर व मा. जिल्हा वैद्यकीय अधिकारी ,सोलापूर यांना माहितीसाठी प्रत जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीकडून पाठविण्यात आली आहे. तसेच सदरचे रिक्त पद त्वरित भरण्यात यावे याबाबत जनशक्ती आग्रही असल्याचे दिसून येत आहे. यावेळी निवेदन देताना जनशक्ती परिवर्तन विकास आघाडीचे समन्वयक मोहसिन शेख, फारूक शेख, विनोद करडे, इन्नूस सय्यद, राम चव्हाण, समीर काझी, आकाश देवकर आदी उपस्थित होते.