Uncategorized

अकलूज येथे शिवजयंतीनिमित्त सम्राट प्रतिष्ठानतर्फे जिलेबी वाटप

अकलूज(युवापर्व) : बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त शहरातील महादेवनगर परिसरात हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रत्यक्ष दर्शन पाहण्यास मिळाले . सालाबादप्रमाणे सम्राट प्रतिष्ठानकडून शिवजयंती ही विविध सामाजिक उपक्रम राबवत मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येत असते. या कार्यक्रमातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले.

तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जमलेल्या लहान बालकांना जिलेबी वाटप करण्यात आली. या परिसरातील लहान मुलांसह असंख्य माता-भगिनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास सम्राट प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button