अकलूज (युवापर्व) : अकलूज शहरातील महर्षी चौक ते मे.धारसी जीवन गॅस ऑफिस आणि स्टार बेकरी ते कर्मवीर चौक येथील रहिवाशांना रस्ता ओलांडण्यासाठी जीव मुठीत धरून चुकीच्या दिशेने छोट्या मोठ्या वाहनांना सतत ये-जा करावे लागत आहे . यामुळे पूर्वी अनेक अपघातही झालेले आहेत. सदरच्या बायपास रस्त्यावर नवीन ड्रेनेजचे कार्य पूर्ण झालेले असून त्यावर वाहतूक व रहदारीस सोईस्कर होईल अशा पध्दतीने डांबरीकरण करण्यात आलेले नाही. त्यावरही लक्ष केंद्रित होणे अपेक्षित आहे.
अकलूज बायपासमार्गे श्रीपूरकडे जाण्यास व शहरातील महादेवनगर,शिवाजीनगर ,सुजयनगर परिसरातील नागरिकांना रस्ता ओलांडण्यास होणारी गैरसोय दूर व्हावी या दृष्टीने सा.बांधकाम विभागाकडून दखल घेत सदरचा विषय तात्काळ मार्गी लावण्यात यावा; अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून मागणी करण्यात आली आहे. यावेळी सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंत्या सौ.पाटील मॅडम यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माळशिरस विधानसभा कार्याध्यक्ष मोहसिन शेख ,युवक ता.कार्याध्यक्ष अमोल माने,इन्नूस सय्यद,इम्रान बागवान,फारूक शेख,नयुम बागवान आदी उपस्थित होते.