आपला तालुकाआपले शहरशैक्षणिक
कु.समिक्षा समीर माने शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेत प्रथम
अकलूज (युवापर्व) : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक शाळा,अकलूज 1मे रोजी शाळेत वार्षिक निकाल वाटप करण्यात आला. यामध्ये कु.समिक्षा समीर माने (इयत्ता २री तु- ब) हिचा संस्थेतून प्रथम क्रमांक, इयत्तेतून प्रथम क्रमांक,तुकडीतून प्रथम क्रमांक, तसेच इंग्रजी हस्ताक्षर प्रथम क्रमांक, कविता गायन प्रथम क्रमांक, मराठी हस्ताक्षर उत्तेजनार्थ, स्नेहसंमेलन द्वितीय क्रमांक आला आहे.
या दैदीप्यमान यशाबद्दल कु.समिक्षा समीर माने हिचे सर्वत्र कौतुक होत आहे. परिसरातील लहान मोठे अभिनंदन आणि शुभेच्छा देत आहेत. पण कु.समिक्षा बरोबरच तिच्या पालकांनी मात्र वर्ग शिक्षिका कोरबू मँडम यांनी विद्यर्थ्यांसाठी घेतलेले परिश्रम आणि शिस्तप्रिय मुख्याध्यापिका शेख मँडम यांचे अभिनंदन केले आहे.