श्रीपूरमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी
श्रीपूर(युवापर्व) : राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठान श्रीपुर यांच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १५० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत शैक्षणिक क्रांती घडावी यासाठी मोठे योगदान दिले.
विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सवलत देण्यावर भर देण्यात आली. विदयार्थ्यांसाठी वसतिगृहाची व्यवस्था, विविध सोयी सवलती देण्यात आल्या ; असे अनेक धोरणात्मक निर्णय राजर्षी शाहू महाराज यांनी बहुजन रयतेसाठी केले आहेत. अशा थोर राजाच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्याचे वाटप प्रतिष्ठानकडून करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रहीम भाईजी शेख यांनी सांगितले.
यावेळी सतीश भाऊ लांडगे, जगदीश इंगळे, निखिल उघडे , दीपक लोंढे, खजिनदार ऋतिक मुलाणी, राजाभाऊ सुरवसे ,भोला भोसले ,अध्यक्ष करण जाधव, सचिव सदानंद बनसोडे , उपाध्यक्ष सिद्धार्थ भोसले, शैलेश शेंडगे, करण लांडगे, प्रेमनाथ लांडगे, सेक्रेटरी अनिकेत कदम ,निखिल ढवळे, अथर्व गायकवाड, सहसचिव सोमनाथ मंडले ,बंडू नवगिरे उपस्थित होते. तसेच सतीश भाऊ लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सदानंद बनसोडे यांनी आभार मानले.