आपले शहरसामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर – महिला स्वाभिमानाचा भारतीय दीपस्तंभ…… प्रा . मिनाक्षी अमोल जगदाळे

जगात आणि भारतात गेल्या शतकात स्त्रीकेंद्रित आणि स्त्री-संबंधित समस्यांवर चर्चा अधिक तीव्रतेने सुरू झाली, आजही सुरू आहे. महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न झाले. या प्रवासात अनेक टप्पे आले. जागतिक स्तरावर पुरुषप्रधान संस्कृतीत लिंगभेदामुळे अनेक देशांमध्ये उपेक्षित, शोषित, अन्यायग्रस्त आणि वंचित महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी दीर्घकाळ संघर्ष केला. त्यामुळे युरोप-अमेरिकेसारख्या प्रगत आणि लोकशाही देशातही दीडशे वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.

१९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून तर १९७५-८५ हे वर्ष महिला दशक म्हणून साजरे करण्यात आले. स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीवाद अशा संकल्पना या काळात लोकप्रिय होत्या. पण भारतात महिलांच्या कल्याणाची कल्पना आणि त्यांचे कार्य फार पूर्वीपासूनच फोफावू लागले होते. याचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या अहिल्याबाई यांचा जन्म सुमारे ३०० वर्षांपूर्वी म्हणजे १७२५ मध्ये झाला. असे गौरव उद्गार जिजाऊ ब्रिगेड महिला आघाडीच्या सोलापूर जिल्ल्ह्याच्या प्रा . सौ मीनाक्षी अमोल जगदाळे ,यांनी यावेळी बोलताना सांगितले .पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी यांना वंदन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मल्हाररावांचा मुलगा खंडेराव याच्याकडे मल्हाररावांनी अहिल्येला राज्यकारभाराचे संपूर्ण शिक्षण दिले. त्यांच्या शुद्ध आचरणामुळे आणि अतुलनीय परिश्रमामुळे त्या लोकांमध्ये “वंदनीय राजमाता” म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.या कार्यक्रमासाठी सौ मिनाक्षी अमोल जगदाळे ,डॉ सौ , अर्चना गवळी ,सौ अश्विनी चव्हाण,सौ सुषमा पाटील , सौ शितल जाधव , सौ बालिका गोवे , सौ संध्या सावंत , सौ रूपाली जगदाळे , सौ अर्चना सूर्यवंशी , सौ हासिना बक्षी , सौ स्वाती देवकर ,सौ सुप्रिया जगताप , सौ सुरेखा केदारी , सौ अनिता खटके , सौ सुवर्णा शेंडगे , सौ सुशिला गवलीं ,डॉ शिवानी टीलेकर , सौ सारिका कांबले, सौ सुषमा खरे,सौ राबिया शैख़, सौ शामबला तरंगें, सौऐश्वर्या पिसे या महिला उपस्थित होत्या .

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button