फोंडशिरस येथे शिवजयंती निमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिर संपन्न

युवापर्व(नातेपुते) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त दि १८ फेब्रुवारी रोजी प्राथमिक शाळा फोंडशिरस येथे डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते . पुण्याचे नामांकित नेत्र तज्ञ एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी, हडपसर व युवा नेते सलीम भाई मुलाणी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी शिबिराचे आयोजन फोंडशिरसचे ग्रामस्थ व मित्र परिवाराकडून करण्यात आले.

या शिबिराच्या सुरूवात प्रसंगी सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करताना यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, मुस्लिम समाजाचे नेते बशीर मुलाणी, माजी उपसरपंच उमाजी बोडरे, माजी सरपंच संपत डोपे , दलित समाजाचे नेते दादासाहेब ढवळे,डॉ मोटे, हसनभाई मुलाणी,पत्रकार प्रशांत खरात,समाजसेवक सुनील दाते,अध्यक्ष तेजस गोरे,डॉ सोमनाथ केंगार,बंडू पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरजी,नितीन भाऊ कदम,औदुंबर पवार,विकी शेठ,सुनील गोरे,मयूर पाटील,बबलू खरात आदींच्या हस्ते करण्यात आले.

या नेत्र तपासणी शिबिरास एकुण ५७६ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली. या शिबिरातील मोतीबिंदू व दृष्टिदोषाचे एकुण ४८ नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच १६५ नागरिकांना अल्पदरात चष्माचे वाटप करण्यात आले. सदरील नेत्र तपासणी शिबिराचा असंख्य नागरिकांना लाभ झाला असून सलिमभाई मुलाणी यांच्या या स्तुत उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.