क्रीडामहाराष्ट्र

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव तालुकास्तरीय स्पर्धेत लुमेवाडी शाळचे यश

बावडा (युवापर्व) : दि. २२ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव तालुकास्तर स्पर्धेचा पहिला दिवस म्हणजे क्रीडा प्रकाराच्या मैदानी स्पर्धा आज केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. लुमेवाडी शाळेतील मोठ्या गटाने(इयत्ता ६ ते ८) कबड्डी(मुले) मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला त्यांची जिल्हास्तर स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच लुमेवाडीचा आसिफ काझी या विद्यार्थ्यांने देखील गोळा फेक क्रीडा प्रकारात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तो देखील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला. कबड्डी संघातील खेळाडू व आसिफ चे सर्व उपस्थित मुलांनी व शिक्षक,पालकांनी अभिनंदन केले.खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम वर्गशिक्षक योगेश पांढरे,डॉ उषा भोईटे,मंदा उतळे, साळुंखे सर,खाडे सर,बाड मॅडम व मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण सर यांनी केले.या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे विस्तार अधिकारी कोकणे साहेब व केंद्रप्रमुख सुनीता कदम मॅडम यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button