पुण्यात जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षणाधिकार्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ३ कोटी ६० लाखाची मालमत्ता जप्त
पिंपरी-चिंचवड (युवापर्व) : पुण्यातील जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी यांच्यावर अवैध पध्दतीने अमाप मालमत्ता प्रकरणी ला प्र वि पुण्याचे पो नि श्रीराम विष्णू शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरील गुन्ह्यातील आरोपी लोकसेवक तुकाराम नामदेव सुपे,वय – 59 वर्षे, तत्कालीन शिक्षणाधिकारी माध्यमिक जि प पुणे. (सध्या सेवा निवृत्त)रा.कल्पतरू, गांगर्डेर नगर,सुदर्शन हॉस्पिटल समोर, पिंपळे गुरव, पुणे येथे स्थित आहे . शिक्षण विभागातील त्याचा परिक्षण कालावधी सन 1986 ते 25 डिसेंबर 2021 पर्यंत या कालावधीत 03,59,99,590 रक्कम :- /-रू अवैध मार्गाने मिळवल्याचे निष्पन्न झालेले आहे.ह्या गुन्ह्याची नोंद सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे गु.र.नं. 632/2023, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 13 (1)(ई), 13(2), भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारित कायदा 2018 चे कलम 13(1)( ब) व 13 (2) प्रमाणे दि. 06 डिसेंबर 2023 रोजी 11:23 वा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरील घटनेतील हकीकत अशी की , यातील आरोपी लोकसेवक तुकाराम सुपे यांचेविरुध्द सायबर पो स्टे पुणे शहर गु र नं 56/2021 भा द वि क 406,409,420,467 वगैरे प्रमाणे दाखल असून त्यागुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यात आलेली 02,87,99,590/- रू रोख रक्कम व 145 तोळे सोने किंमत 72,00,000/- रू असे एकूण :- 03,59,99,590/रू मालमत्ता ही भ्रष्ट मार्गाने धारण केलेली अपसंपदा असून ती त्यांच्या लोकसेवक सेवा कालावधीतील वैध उत्पन्नापेक्ष्या अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणून त्यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे क 13 (1) (ई) सह 13(2) व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सुधारणा कायदा क 13(1) ( ब) 13 (2) प्रमाणे सांगवी पो. स्टे. पिंपरी चिंचवड गु.र.नं 632/2023 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.