राष्ट्रवादीच्या इंदापूर शहराध्यक्ष पदी ॲड. इनायतअली काझी यांची निवड
इंदापूर (युवापर्व ) : तालुक्याचे प्रसिद्ध कायदेतज्ञ तथा इंदापूर शहरातील नावाजलेले व्यक्तिमत्व ॲड. इनायतअली जफरअली काझी यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) इंदापूर शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
गुरुवार दि.२३ नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी पार पडलेल्या पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात निवड करण्यात आली. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ॲड.काझी यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रवीण माने, पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष ॲड. तेजसिह पाटील, महारुद्र पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. या फुटीनंतर इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे अजित पवार गटात सामिल झाले होते. परिणामी इंदापूर तालुक्यात पक्षाच्या पुनर्बाधणीकरिता विविध पदांसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू होती. विधीतज्ञ असण्यासह ॲड. काझी यांना मागील १०-१२ वर्षांची सामाजिक कार्यांची पार्श्वभूमी आहे. दांडगा जनसंपर्क, तथा सर्वसमावेशक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या काझी यांच्या रूपात राष्ट्रवादीला इंदापूर शहरात उच्च शिक्षित चेहरा मिळाला आहे. त्यांच्या निवडीनंतर साहजिकच इंदापूर शहरात शरद पवार गटाची ताकद वाढणार असल्याचेही बोलले जात आहे. पक्षाने दिलेल्या संधीचं सोनं करू व पक्षाचे विचार सामान्यांन जनतेपर्यंत पोहचवू असे मत अॅड. काझी यांनी निवडीनंतर व्यक्त केले.