अकलूज : अकलूज नगरपरिषद प्रथम वर्धापन दिनानिमित्त,आझादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा अभियान अंतर्गत अकलूज नगरपरिषद वतीने अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सर्व जि.प.शाळा मधील विद्यार्थी यांच्या मनात देशप्रेम, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या व्यक्तींनी आपले बलिदान दिले तसेच आपले सैनिक यांच्याविषयी जाज्वल्य भावना निर्माण करण्यासाठी केंद्रशासनाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे.त्याअनुषंगाने अकलूज नगरपरिषद ने जि.प.शाळेतील इयत्ता १ ली ते ४ थी व ५ वी ते ७वी या दोन गटात चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धांचे उद्घाटन अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी श्री. दयानंद गोरे व कार्यालय अधिक्षक सुनील काशिद यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धा ह्या अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रातील एकूण ११ जि.प.शाळेमध्ये आयोजन करण्यात आले. मुख्याधिकारी साहेब यांनी शाळेतील विद्यार्थी यांना आपल्या भारत देशाच्या तिरंगा झेंडा विषयी माहिती देऊन, येत्या दिनांक १३ ते १५ ऑगस्ट रोजी सर्व मुलांनी आपल्या घरी आपला प्रिय तिरंगा झेंडा उस्फूर्तपणे अभिमानाने आपल्या आपल्या घरावरती फडकवावा तसेच योग्यरित्या कसा फडकवावा या विषयी माहिती देऊन सर्व जि.प.विद्यार्थ्यांना अकलूज नगरपरिषद तर्फे तिरंगा झेंडा देण्यात येणार असल्याचे सांगितले. चित्रकला स्पर्धेत बक्षीस क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना अकलूज नगरपरिषद तर्फे विविध शालेय साहित्य देण्यात येणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अकलूज नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाच्या सौ. नाजनीन शेख मॅडम, नगरपरिषद कर्मचारी श्री.नरेंद्र पाटोळे तसेच जि.प.केंद्रप्रमुख जाधव सर व शिक्षक वर्ग यांनी उत्तमरित्या नियोजन केले.