अकलूज(प्रतिनिधी) : जनशक्ती परिवर्तन विकास आघाडी व मुस्लिम समन्वय समिती अकलूज शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आयुष्यमान गोल्डन कार्ड (५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार) व नवीन मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधत दि. ६ व ७ जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी एकुण १३६ नागरिकांनी सहभाग नोंदवत शिबिरास उत्तम प्रतिसाद दिला. या दोन दिवसीय शिबिरात एकुण १०८ नागरिकांचे आयुष्यमान गोल्ड कार्ड व २८ नवीन मतदारांची नाव नोंदनी करण्यात आली असल्याची माहिती पत्रकार तथा समन्वय मोहसिन शेख यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.
अकलूज शहरातील पंचशिल नगर,बागवान गल्ली,रामायण चौक,काझी गल्ली,दत्त चौक या ठिकाणीच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून २६ जानेवारी पर्यंत आयुष्यमान कार्डच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये या उद्देशातून शहरातील विविध भागात शिबिर राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शेख यांनी दिली . हा शिबिर यशस्वी करण्याकरिता मुस्लिम समन्वय समितीचे शहराध्यक्ष समीरभाई काझी , मोहिद्दीन शेख , बख्तियार पठाण , शोएब बागवान , इन्नूसबाबा सय्यद , फारूख शेख , वसिम पटेल , रियाज शेख, मोनू कोरबू , सद्दाम काझी ,आयान तांबोळीसह आदींनी अथक परिश्रम घेतले .