
अकलूज(युवापर्व) : जनशक्ती परिवर्तन विकास आघाडी व मुस्लिम समन्वय समिती अकलूज शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात आयुष्यमान गोल्डन कार्ड (५ लाखांपर्यंतचे मोफत उपचार) व नवीन मतदार नाव नोंदणी शिबिराचे आयोजन मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत दि. ६ व ७ जानेवारी रोजी करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार तथा समन्वय मोहसिन शेख यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

अकलूज शहरात दि.६ जानेवारी रोजी कौलारू शाळेसमोर बागवान गल्ली व दि. ७ जानेवारी रोजी काझी गल्ली येथे शिबीर घेण्यात येणार आहे. तरी शहरातील सर्व नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ;असे आवाहन शेख यांनी केले आहे.