पत्रकाराच्या संघर्षमय जीवनावर आधारीत अहम चित्रपट १२ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
अकलूज (युवापर्व) : लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार जर प्रामाणिक असेल तर तो अन्यायी व्यवस्थेला आपल्या लेखणीच्या माध्यमातून मोठे आव्हान उभे करू शकतो. अशी व्यवस्था बदलण्याचे त्याच्यामध्ये बलाढ्य सामर्थ्य असते. अशाच प्रामाणिक, इमानदार पत्रकाराच्या लढ्यावरती आम्ही अहम नावाचा मराठी चित्रपट तयार केला असून येत्या १२ मे २०२३ रोजी तो महाराष्ट्रातील सर्व चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे निर्माते योगेश घोलप यांनी अकलूज येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली.
अहम चित्रपटाच्या टिमकडुन आज अकलूज येथे चित्रपटाचा टिझर पत्रकारांना दाखवण्यात आला व चित्रपटाच्या आशयाची माहिती देण्यात आली. समाजाचा महत्वाचा घटक असलेल्या पत्रकारांवर अद्याप मराठी चित्रपट तयार झाला नाही. त्यामुळे आम्ही हा नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहोत. या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण माळशिरस तालुक्यामध्ये झालेले आहे. यात बहुतांश कलाकार हे स्थानिक आहेत. नवे चेहरे, नवा विषय आणि विषयाला धरून असलेली गीते नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतील अशी आशा यावेळी चित्रपटाचे मुख्य अभिनेते अमिर शेख व अभिनेत्री मृणाली कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
यावेळी चित्रपटचे सहनिर्माता शमा शेख, दिग्दर्शक असिफ तांबोळी, सहदिग्दर्शक रशिद आतार, कार्यकारी निर्माता पांडुरंग शिंदे, सुनिल माने, कलाकार डॉ. विकास सावंत, सुनिल माने, श्रेया वाङेकर, जगन्नाथ घाडगे, मनोहर सुतार, गणेश काटु, जगदिशचंद्र देसले, प्रज्ञा सुर्यवंशी, नवनाथ गायकवाड, सुधिर गिरी, युवराज वळकुंदे, हनुमंत शेगर, विजय बोकफोडे, तानाजी बोकफोडे, अभिषेक बोकफोडे, ज्योती सानप, संपत पवार, शौकत तांबोळी,लक्ष्मण गंगावणे,पांडुरंग शिंदे,राणी पाटील,स्नेहा पाटील,रणजीत मोहिते,भारतनाना गायकवाड, संजय मोहिते,सोमनाथ शिंदे,रियाज शेख, संजय गिरी,सुरज मोरे,विनोद बोडके,विनोद चौरासिया उपस्थित होते.