अखेर “अहम” चित्रपटाचा वाद मिटला..!
मुंबई (युवापर्व) : मराठी सिनेमासृष्टी जगतातील सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार १२ मे ला पाहून चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होत आहे . प्रदर्शनाची तारीख अगदी जवळ आली तरी सुद्धा चित्रपटाचा ऑफिसवर टीझर, टेलर किंवा गाणी सोशल मीडियावर आली नव्हती. आम्ही ज्यावेळेस माहिती मिळवली त्यावेळेस समजलं की या चित्रपटांमध्ये दोन गट पडले.
एक डायरेक्टर आसिफ अब्दुल भाई तांबोळी आणि दुसरा फिल्म अभिनेता अमीर शेख हे दोघे एक काळ एकमेकांचे भाऊ मानत असलेले आज एकमेकांच्या विरोध पाहायला मिळाले. काही कलाकार सुद्धा या गटामध्ये वेगवेगळे मत मांडताना दिसून आले. आसिफ अब्दुल भाई तांबोळी व अमीर शेख हे दोघे एकमेकांच्या समोर यायला तयार नव्हते. वाद एवढा होता की बरेच कार्यक्रम रद्द करण्यात आले.
शेवटी निर्माता योगेश सुखदेव घोलप यांच्या मध्यस्थीने या दोघांचे वाद मिटले आणि उद्या २५ एप्रिल ला टीझर लॉन्चिंग चा कार्यक्रम अकलूज येथे आयोजित केला असल्याची माहित समोर आली आहे.