आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरमहाराष्ट्रराजकारणसमाजकारण

अकलूज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद यात्रेचा शुभारंभ

अकलूज : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकलूज मध्ये १६ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.आज या जनसंवाद यात्रेचा शुभारंभ अकलूज मधिल रमामाता चौक येथून करण्यात आला. सदर संवाद यात्रेत गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढ,भाजीपाला,डाळी याचे दर कमी करण्यासाठी आताच्या शिंदे सरकारला व मोदी सरकारला आलेलं अपयश आदी अकलूज मधिल नागरिकांना आणि मतदारांना समजावून सांगणार असुन त्याची अडचणी जाणून घेण्यासाठी या जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष अशोक दादा गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे, राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक विभाग सरचिटणीस साजिद भाई सय्यद, अकलूज शहर अध्यक्ष सुरेश गंभीरे रा.युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष जाकिर शेख ,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पिंटू ढेरे,लक्ष वेधीसेनेचे प्रमुख अनिल भाऊ साठे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय अकलूज शहर अध्यक्ष अभिषेक गायकवाड, रा.काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष रहिमशेख ,शहर उपाध्यक्ष इरफान बागवान, शहर सचिव जुबेर बागवान,शैलेंद्र दुपारगोडे आदी मान्यसह परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button