अकलूज शहराध्यक्ष पदी समिरभाई काझी व निमगांव अध्यक्ष पदी निहाल शेख यांची निवड
मुस्लिम समन्वय समितीकडून पद नियुक्त्या जाहिर
माळशिरस (युवापर्व) : महाराष्ट्र राज्य मुस्लिम समन्वय समितीच्या अकलूज शहराध्यक्ष पदी समीरभाई काझी तर निमगांव अध्यक्ष पदी निहाल शेख यांची निवड करण्यात आली. सदरची निवड प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाध्यक्ष सलिमभाई मुलाणी यांनी केली. माळशिरस तालुक्यासह अकलूज शहरामध्ये मुस्लिम समन्वय समितीची गावनिहाय वाढती संघटनात्मक बांधणीतून सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक हितार्थ मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जुडत आहे.
विविध सामाजिक प्रश्न शेवटच्या घटकांपर्यंत पोहचून प्रश्न सोडवणे हाच एकमेव उद्देश असल्याचे शहराध्यक्ष समिर काझी यांनी मत व्यक्त केले. अकलूज शहरात मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येत वास्तवास असून त्यांचे उद्भवणारे विविध प्रश्न मार्गी लावण्यास समिती नक्कीच योगदान देणार आहे.निवडीनंतर दोन्ही शहराध्यक्षांचा समितीकडून सत्कार करताना अस्लम मुजावर, रियाज मुजावर, आमिर पठाण, माळशिरस शहर अध्यक्ष समीरभाई मुलाणी, आनंदनगर शहराध्यक्ष इक्बाल शेख, अस्लम इनामदार, वसिम पटेल, आरिफ मुलाणी,आमिर मुलाणी आदी उपस्थित होते.