मांडवे येथील रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद
मांडवे(युवापर्व) : मांडवे गावचे आमचे जिवाभावाचे युवा मित्र श्री.निलेश (भाऊ) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मांडवे येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन दि.१ सप्टेंबर २०२३ रोजी करण्यात आले होते. यावेळी परिसरातील एकुण १५० रक्तदात्यांनी रक्तदान करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी कार्यक्रम स्थळी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने-पाटील, होलार समाजाचे राज्य अध्यक्ष नंदुकुमार केंगार, मा.पंचायत समिती सदस्य अजय सकट, मांडवे गावचे सरपंच हनुमंत टेळे , होलार समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल ढोबळे, बाळु मिसाळ, हनुमंत साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन दुधाळ, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गायकवाड , निरराज मित्र परिवाराचे सर्वेसर्वा लकी बोडर ,अमित करने ,बाळु मिसाळ, अभिजित केंगार, प्रशांत जाधव (अकलुज), कालिदास रूपनवर उपस्थित होते.
तसेच निलेश भाऊ शिंदे यांच्या वाढदिवस निमित्ताने याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना वही वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलराज मित्र परिवाराचे सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.