अकलूज (युवापर्व):अकलूज ग्रामपंचायतचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर नगरपरिषद अधिनियमाप्रमाणे थकीत मालमत्ता कर प्रती महिना दोन टक्के क्षेत्राप्रमाणे शास्ती आकारण्यात आले होती. सदरची शास्तीची रक्कम मोठया प्रमाणावर वाढत गेल्याने नागरिकांच्या मागणीनुसार लोक अदालत मध्ये शास्ती कमी करून मूळ रक्कम मुद्दल भरणे बाबत लोक अदालत मध्ये मांडण्यात आले होते.त्यानूसार संबंधितांना नोटीस दिल्या होत्या.याचा ३९८ नागरिकांनी फायदा घेतलेला आहे.सदरील शास्ती कमी करून मूळ थकबाकी भरण्यात आलेली आहे.त्यानुसार थकीत मालमत्ता कर ६४ लाख रुपये, थकीत पाणीपट्टी कर ४ लाख रुपये तसेच थकीत गाळे भाडे ४ लाख रुपये असे एकूण थकीत कर ७२ लाख रूपये वसूल करण्यात आले आहे.
तसेच जे थकबाकी असणारे नागरिक यांनी लोक अदालत मध्ये आले नाहीत.अशा सर्व नागरिकांनी आपला थकीत कर मार्च अखेर पर्यंत हप्त्यामध्ये भरावा.ज्या नागरिकांचे थकीत कर आहे त्यांच्यावर नळ कनेक्शन तोडणी, गाळे सील करणे, जप्ती करणे या प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.तरी थकीत कर असणाऱ्या नागरिकांनी आपला थकीत कर भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे.