आपले शहरविशेष

अकलूजमध्ये लजीना लेडीज शाॅपीचे सौ. शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

अकलूज(युवापर्व) : अकलूजमध्ये नव्याने साकारलेल्या लजीना लेडीज शाॅपीचे दिमाखात उद्घाटन सोहळा सौ. शीतलदेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते दि.४ नोव्हेंबर रोजी संपन्ना झाला. अकलूजच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय लगतच्या जय हिंद कॉम्प्लेक्स गाळा नं.3 येथे फॅन्सी सीरीज,कुर्ती,ड्रेस,लेगिज व इतर वेअरचे वस्त्रदालन परिसरातील महिला-भगिनींच्या सेवेत सुरू करण्यात आले आहे.

शहरातील महिलांनी आर्थिक सहाय्यता करीता बचट गटाच्या माध्यमातून पतपुरवठा मिळवून व्यवसाय,लघुउद्योगातून स्वता: व आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी मिळालेल्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन सौ.मोहिते-पाटील यांनी केले आहे. नव्याने शहरवासियांच्या सेवेत सुरू झालेल्या लजीना लेडीज शाॅपीस मोहिते पाटील कुटुंबीयांकडून सौ.शीतलदेवी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी तांबोळी कुटुंबीयांनी सुरू केलेल्या लेडीज शाॅपीस शहरातील सामाजिक,राजकिय मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. या नवीन शुभारंभलेल्या लेडीज शाॅपीच्या व्यवसायातून शहराच्या विकासात नक्कीच भर पडेल.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button