महाराष्ट्रसमाजकारण

रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने जागतिक तृतीयपंथी ओळख दिन साजरा

पिंपरी-चिंचवड (युवापर्व) : तृतीय पंथी व्यक्तीना सुप्रीम कोर्टाने ‘तिसरे’ लिंग म्हणून २०१४ मध्ये मान्यता दिली. त्यामुळे ‘इतर’ / तृतीयलिंगी व्यक्ती म्हणून कायदेशीर रित्या वैध मार्गाने जीवन जगता येऊ लागले. या निमित्ताने महाराष्ट्र सरकार तर्फे तृतीय पंथी ओळख सप्ताह पाळला जातो. यानिमित्ताने रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने व रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या सहकार्याने जागतिक तृतीयपंथी ओळख दिन साजरा करण्यात आला.काळेवाडी नढे नगर येथील रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तृतीयपंथी बांधवाना समाज मान्यता नसताना देखील परिस्थितीशी संघर्ष करत प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्ववाचा ठसा उमटवणाऱ्या तृतीयपंथी बांधवांचा शाल,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला व मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

तृतीयपंथी बांधव आर्थिक सक्षम व्हावे याकरिता बचत गटाची स्थापना करणाऱ्या तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता ‘दलजीत सिंग’ यांचा यावेळी शाल गुलाबपुष्प,देऊन विशेष सन्मान करण्यात आला.तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या सिद्धी कुंभार व रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तृतीयपंथी बांधवांच्या सक्षमीकरणाकरिता सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या उपाध्यक्ष रितिका परमार, सदसय- रिद्धी जाधव, आरोही राठोड, रोहिणी मोरे, गायत्री थेरगावकर यांचा देखील सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि २०१४ साली कोर्टाने तृतीयपंथी बांधवांना तिसरे लिंग म्हणून मान्यता देत असताना समाजाकडून देखील त्यांना आपलंस करणारा बंधुत्वाचा हात दिला गेला पाहिजे.रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने आपुलकीचा हात देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. यावेळी रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. रामा बोरखडे यांनी असे मत व्यक्त केले कि तृतीयपंथी बांधवाना समाजात प्रतिष्ठा मिळावी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या याकरिता आमची संस्था कार्य करते व या तृतीयपंथी बांधवांच्या सक्षमीकरणासाठी रयत विद्यार्थी विचार मंच सारख्या संस्था पुढाकार घेत आहेत हि स्वागताहार्य बाब आहे.

यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, राज्य समन्वयक श्वेता ओव्हाळ,सहसचिव भाग्यश्री आखाडे,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मयूर जगताप, रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा भोरकडे,खजिनदार निलेश पवार,सचिव सिद्धी कुंभार,उपाध्यक्ष रितिका परमार,तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्ता ‘दलजीत सिंग’ सदसय- रिद्धी जाधव, आरोही राठोड, रोहिणी मोरे, गायत्री थेरगावकर हे उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button