आपला तालुकामनोरंजनमहाराष्ट्र

“अहम” या मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग चा कार्यक्रम माळशिरस येथे संपन्न

माळशिरस(युवापर्व) : उम्मीद फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि निर्माता योगेश सुखदेव घोलप व विघ्नहर्ता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांची निर्मिती असलेला “अहम” हा मराठी चित्रपटाचे पोस्टर लॉन्चिंग चा कार्यक्रम माळशिरस येथे १५ मार्च सं.०६.०० वा अगदी दिमाखात पार पडला . असिफ अब्दुल भाई तांबोळी यांच्या डायरेक्शन मध्ये बनलेला ॲक्शन कॉमेडी लव आणि साउथ थीम असलेला मराठी चित्रपट १२ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज होत आहे. माळशिरस सारख्या ग्रामीण भागात तयार झालेला चित्रपट मे मध्ये रिलीज होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून या चित्रपटाबद्दल चित्रपट सुपरहिट होवो अशी आशा मान्यवरांनी व्यक्त केली.

माळशिरस बरोबर सोलापूर जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवेल अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले.या कार्यक्रमात चित्रपटातील संपूर्ण टीमच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चालू होता. या चित्रपटाचे मुख्य कलाकार प्रमुख भूमिकेतील अमीर शेख,मृणाल कुलकर्णी, डॉ.विकास सावंत,सुनील माने, मनोहर सुतार, डॉ.प्रज्ञा सूर्यवंशी,पांडुरंग शिंदे, विजय भोकपडे,भारत गायकवाड, नवनाथ गायकवाड, चंद्रशेखर दिसले, जगन्नाथ घाडगे, गणेश काटू ,छाया आदट, तानाजी भोकपडे, संपत पवार, मोहन पवार ,अभिषेक भोकपडे ,सुधीर गिरी ,सुरज मोरे, लाला सिद, रियाज शेख, शौकत तांबोळी, राणी राजापुरे पाटील, स्नेहा राजापुरे पाटील, बालकलाकार श्रेय वाडेकर, कलाकार संजय मोहिते ,उमेश दळवी, दया लांडगे ,लक्ष्मण गंगावणे, महादेव लांडगे, युवराज वळकुंदे, संजय गिरी, अनिल माने इत्यादी कलाकार बरोबर सह दिग्दर्शक रशीद आतार, डीओपी विनोद बोडके, लोकेशन मॅनेजर विलास वामन, त्याचबरोबर नगरसेवक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पोस्ट लॉन्चिंग चा कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमाला मेघराजाने सुद्धा उपस्थिती दाखवली. त्यामुळे लोकांची अचानक आलेल्या पावसामुळे थोडी तारांबळ उडाली आणि नंतर कार्यक्रम सुरळीत चालू झाला आणि पोस्टर लॉन्चिंग चा कार्यक्रम पार पडला.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button