आपला जिल्हाआपला तालुकाआपले शहरक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिक

महर्षी प्रशालेचे १३ वर्ष वयोगटातील दोन खेळाडूंची जिल्हा बास्केटबॉल संघामध्ये निवड

अकलूज : सेलिब्रेशन ग्राउंड, सोलापूर येथे दि.२० व २१ ऑक्टो २०२२ रोजी जिल्हा बास्केटबॉल संघ निवड चाचणी संपन्न झाली. त्यामध्ये महर्षी प्रशालेच्या कु.श्रावणी रणवरे व सलोनी गायकवाड हयाची जिल्हा बास्केटबॉल संघामध्ये निवड झाली सदर निवड झालेले खेळाडू २८ ऑक्टो ते १ नोव्हें २०२२ या कालावधीमध्ये कोल्हापूर येथे राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी जाणार आहेत. या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे बास्केटबॉल कोच अनिल जाधव सर , डॉ महेश ढेंबरे , शशांक गायकवाड सर,लखन‌ मोरे सर , प्रदीप पांढरे सर यांचे मार्गदर्शन मिळाले .

सदर खेळाडूंच्या निवडीनंतर शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, सदस्या प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु स्वरूपाराणी मोहिते पाटील, सचिव अभिजीत रणवरे साहेब,सहसचिव हर्षवर्धन खराडे साहेब, सर्व संचालक स्थानिक प्रशाला समिती चे सभापती एडवोकेट नितीनराव खराडे साहेब, सर्व प्रशाला समितीचे सदस्य, मुख्याध्यापक संजय गळितकर सर, यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील कार्यास खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button