अकलूज शहरात ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न
अकलूज : अकलूजमध्ये जश्ने ईद-मिलादुन्नबी अर्थात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागात हिंदू-मुस्लिम बांधवांत बंधुभावाबरोबरच सामाजिक सौहार्द द्विगुणी व्हावे ; या अनुषंगाने विविध उपक्रम राबवण्यात आले.

अकलूज शहरातील राऊतनगर परिसरात पैगंबर जयंती व कोजागिरी पौर्णिमा या निमित्ताने संयुक्त पध्दतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास हिंदु- मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत; मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे दाखवून दिले. ९२ रक्तदात्यांनी शिबीरास उत्स्फूर्त सहभाग होत समाजापुढे आपआपसात बंधुत्व ठेवण्याचे आवाहन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते फारूख शेख व मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले.

दि.८ ऑक्टोबर रोजी सायं. दरम्यान शहराच्या लगतच असलेल्या शंकरनगर हद्दीतील शिवतेजनगर येथे पैगंबर जयंतीचे औचित्य साधून परिसरातील बंधु-भगिनींकरिता KGN ग्रुप शिवतेजनगर च्यावतीने सार्वजनिक लंगरची भोजण व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये शहरासह परिसरातील असंख्य समाज बांधवांनी लंगरचा आस्वाद घेतला.

तसेच पैगंबर जयंती दिनी KGN ग्रुप शिवतेजनगर यांच्याकडून प्रतापसिंह चौक ,जुना पंढरपूर नाका अकलूज येथे सरबतचे वाटप करण्यात आले. इस्लाम धर्मसंस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवण प्रमाणे तहानलेला पाणी पाजणे यापेक्षा मोठे पुण्याचे काम नाही. रस्त्यावरून जाणारे दुचाकी वाहकांना सरबत देण्यात आले. प्रेषितांच्या याच शिकवणीचे अनुकरण करत या ग्रुपकडून प्रत्येक जयंतीस सरबतचे वाटप करून करण्यात येत असते. यावेळी सरबत बरोबर जिलेबी,शिरा ही वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत KGN ग्रुपकडून ही परंपरा अखंडीतपणे सुरू आहे.
