मुस्लिम समन्वय समितीच्या माळशिरस शहराध्यक्ष पदी समीरभाई मुलाणी यांची निवड

माळशिरस (युवापर्व) : महाराष्ट्र राज्य मुस्लिम समन्वय समितीची माळशिरस शहराध्यक्ष पद नियुक्ती करण्याबाबत नुकतीच माळशिरस येथे बैठक पार पडली. यामध्ये प्रशासकिय स्तरावरील विविध सामाजिक प्रश्नांची जाण असलेले समीरभाई मुलाणी यांची शहराध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष रशिदभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुकाध्यक्ष सलिमभाई मुलाणी यांनी पत्रक प्रसिद्ध करत ही निवड जाहिर केली. समितीचे ध्येय धोरण व आचार- विचाराचे एकसंध कार्यकर्ता ची फळी निर्माण करून विविध सामाजिक प्रश्नांना मार्गी लावण्याचे प्रयत्न करू असे यावेळी मुलाणी यांनी मत व्यक्त केले. निवडीनंतर शहराध्यक्ष मुलाणी यांचा समितीकडून सत्कार करताना अस्लम मुजावर, मुस्लिम जमात चे अध्यक्ष अजिमभाई मुलाणी, रियाज मुजावर, ऐड. सादिकभाई शेख,नशिर मुलाणी, बाबा शेख, मुबारक तांबोळी, भैय्या इनामदार,अश्रफ मुल्ला आदी उपस्थित होते.
