अकलूज (युवापर्व) : जगाला शांततेचा संदेश देणारे इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद ए मिलादुन्नबी निमित्त अकलूज शहरात दि.१४ सप्टेंबर रोजी स.१० वा.पासून रक्तदान शिबिरास सुरूवात होणार आहे . रा.काँग्रेस शप पक्ष व सहायता वेलफेअर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन अकलूज नगरपरिषद कार्यालय सभागृह येथे करण्यात आले आहे.
” रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान ” या संकल्पनेतून अकलूज शहर व परिसरातील युवक,सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरास उपस्थित रहावे ; असे आवाहन सहायता वेलफेअर फाऊंडेशन अध्यक्ष मोहसिन शेख यांनी केले आहे. रक्तदानातून अनेकांचे जीवन वाचू शकते; या सामाजिक आणि मानवतेच्या विचारातून सहभागी होणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.