आपले शहरसमाजकारण
Trending

अकलूज नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा ; हरवलेले पाकिट रोख रक्कमेसह संबंधितास सुपूर्द

अकलूज (युवापर्व) : अकलूज नगरपरिषद कर्मचारी सागर दत्तू बनसोडे यांना अकलूज नगरपरिषदचे काम सुरु असलेल्या एका साईटवर बांधकाम विभाग आनंद जाधव, अतिक्रमण विभाग शिवरत्न लोंढे, सागर बनसोडे हे कामाची पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना पैशाचे पाकिट रक्कम रूपये 5600 व त्यात महत्वाचे बँकेचे कागदपत्र असल्याचे आढळून आले. हे सर्व माहिती क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांचे स्वीय सहाय्यक रोहित शेटे यांनी लगेच संबंधित कागदपत्रांवरून ते ज्योतिराम रघुनाथ नलवडे रा.चाकोरे यांचे असल्याचे समजले.त्या नागरिकापर्यंत संपर्क साधून त्यांना अकलूज पोलीस स्टेशन येथे बोलावून घेतले.

अकलूज पोलीस स्टेशन निरीक्षक मा.दिपरतन गायकवाड साहेब यांना सर्व हकिकत सांगितली असता, साहेबांनी संबंधित कागदपत्रांवरून त्या नागरिकांची खातरजमा करून त्यांना ते पैशाचे पाकिट रक्कम रूपये 5600 व सर्व कागदपत्रे सागर बनसोडे यांच्या हस्ते संबंधीत नागरिकास सुपूर्द केले. तसेच अकलूज नगरपरिषद प्रामाणिक कर्मचारी सागर दत्तू बनसोडे यांचा त्यांच्या प्रामाणिक पणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच अकलूज नगरपरिषद मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी यांचे असेच सहकार्य रहावे हि अपेक्षा व्यक्त केली.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button