अकलूज येथे दि.९ डिसेंबर रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
शरदचंद्र पवारसाहेब, जयसिंह उर्फ बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त सहायता वेलफेअर फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम
अकलूज (युवापर्व) : कृषीप्रधान भारत देशाचे, माजी केंद्रीय कृषीमंत्री, रा.काँग्रेसचे सर्वेसर्वा आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब व माळशिरस तालुक्याचे किंगमेकर राजकिय चाणक्य आदरणीय श्री.जयसिंह मोहिते-पाटील उर्फ बाळदादा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत डोळे तपासणी,मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सहायता वेलफेअर फाऊंडेशन यांच्यावतीने सोमवार दि.९ डिसेंबर २०२४ रोजी स. ११ ते दु.०३ वा पर्यंत ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथे करण्यात आले आहे.
अकलूज शहर व परिसरातील नागरिकांनी या डोळे तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सहायता वेलफेअर फाऊंडेशन अध्यक्ष मोहसिन शेख यांच्याकडून करण्यात आले आहे. हा शिबिर यशस्वीरित्या संपन्न व्हावे; यासाठी फाऊंडेशन उपाध्यक्ष बाबाभाई सय्यद,सचिव जाकीर शेख ,सहसचिव समिर काझी, कार्याध्यक्ष फारूक शेख ,सदस्य सलमान कुरेशी,नौशाद शेख यांच्याकडून जय्यत तयारी सुरू आहे.