आपले शहरआरोग्यसामाजिक
Trending

डॉ. देवडीकर हॉस्पिटलकडून पत्रकारांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

अकलूज(युवापर्व) : अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टर कै.डॉ.नंदकुमार देवडीकर यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक किडनी दिनानिमित्त दि.९ मार्च रोजी अकलूज शहरासह परिसरातील पत्रकारांसाठी डॉ. देवडीकर हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रक्त, लघवी, इसीजी व सोनोग्राफी तपासणीस शहरासह परिसरातील ४० पत्रकारांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वैद्यकीय वसा व वारसा प्राप्त डॉ.श्रीकांत देवडीकर हे प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम व्याख्याने राबवत सामाजिक बांधिलकी जपत असतात. किडनीच्या आजारास दुर्लक्षित न करता वेळीच उपचार घेतल्यास यावर निदान होऊ शकते. अकलूजसह तालुक्यातील एकूण १५० हून अधिक रुग्ण हे किडनीच्या आजारामुळे डायलेसिस वर अवलंबून आहेत.

रक्तदानाबरोबर अवयव दान विषयी पत्रकार बांधवांनी आपल्या लेखणीतून जनजागृती करावी ; असे आवाहन यावेळी डॉ. देवडीकर यांनी केले आहे. या तपासनी शिबिरास उपस्थित पत्रकार बांधवांकडून डॉ. देवडीकर दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. देवडीकर हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button