देश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्र
Trending

मनोरंजन क्षेत्रातील चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

मार्च-एप्रिल-मे मध्ये चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्यास सफल ठरतील हे चित्रपट

मुंबई(युवापर्व) : सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा चालू आहेत.परीक्षा संपल्यानंतर ३० मार्च २०२३ रोजी अजय देवगन एफ फिल्म रिलायन्स इंटरटेनमेंट टी सिरीज फिल्म ड्रीम वॉरियर पिक्चर्स निर्मित भोला हा चित्रपट येतोय. या चित्रपटात अजय देवगन तब्बू दीपक डोबरी याल संजय मिश्रा आणि गणराज राव यांच्या प्रमुख भूमिका असलेला अजय देवगन यांची ॲक्शन सीन्स आणि जबरदस्त व्ही एफ एक्स बरोबर थ्रील ॲक्शन असा हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षण ठरत आहे .

त्याचबरोबर ७ एप्रिल २०२३ रोजी मराठी फिल्म घर बंदूक बिर्याणी रिलीज होत आहे. यामध्ये हेमंत जंगली अवताडे यांनी दिग्दर्शन केलेले हे चित्रपट जी स्टुडिओ आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित या चित्रपटामध्ये आकाश ठोसर, सायली पाटील, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत ; हा सुद्धा चित्रपट प्रेक्षकांच्या आकर्षण ठरत आहे.

२१ एप्रिल २०२३ रोजी सलमान खान पूजा हेगडे, शहनाज गिल आणि वेंकटेश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ॲक्शन कॉमेडी ड्रामा रोमांस आणि इमोशन असा तडका असलेला “किसी का भाई, किसी की जान” चित्रपट येत्या रमजान ईद निमित्त चित्रपटगृहामध्ये येत आहे. त्यांची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आत्तापासूनच लागली आहे.

मे महिन्यामध्ये रिलीज होत असलेला मराठी फिल्म उम्मीद फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि निर्माता योगेश सुखदेव घोलप व विघ्नहर्ता मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांची निर्मिती असलेला “अहम” हा चित्रपट आसिफ अब्दुल भाई तांबोळी यांचे डायरेक्शन मध्ये बनलेला चित्रपट अमीर शेख, मृणाल कुलकर्णी, डॉ. विकास सावंत ,सुनील माने यांच्या प्रमुख भूमिका असलेला ॲक्शन रोमान्स इमोशन कॉमेडी असा संगम असलेला चित्रपट १४ तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर रिलीज ची तारीख होती. पण चित्रपट सेंसर मुळे तारीख फायनल एप्रिल मे मध्ये होण्याची शक्यता आहे. या चित्रपटांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाची जी ताकद आहे; ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी. संविधानाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने हा चित्रपट बनत आहे. हा सुद्धा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षण करत आहे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button