महाराष्ट्रराजकारण

सांगोला येथे युवक काँग्रेसचे ” युथ जोडो – बुथ जोडो ” अभियान

सांगोला (युवापर्व) : ” युथ जोडो , बुथ जोडो ” कार्यक्रमांतर्गत प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तालुका पातळीवर युवकांची फळी तयार करण्यासाठी प्रांतीक सदस्य मा. प्रा. पि. सी. झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली ,प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी उदयभानू चिंब , सह प्रभारी एहसास खान , प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिकेत आरकडे ,प्रवक्ता दीपकजी राठोड , प्रदेश सचिव श्रीनिवास नलमवार , प्रदेश सचिव अजयसिंह इंगवले ,जिल्हा प्रभारी प्रवीण जाधव, जिल्हाध्यक्ष सुनंजय पवार प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा सरचिटणीस मा.प्रा. सुनील भोरे सर यांनी प्रास्ताविक केले. प्रांतिक सदस्य मा. प्रा . पि. सी. झपके सर यांनी तालुक्यातील विविध प्रश्न ,युवक काँग्रेसच्या पाठीशी कायम उभा राहील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष कुणाल दादा राऊत म्हणाले की आगामी निवडणुकीत युवकांना संधी मिळाली पाहिजे. काँग्रेसचे नेते मा.खा. राहुल गांधी यांची ताकद वाढविण्यासाठी काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त युवकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करेल. यावेळी विधानसभा अध्यक्ष अजितदादा चव्हाण, तालुकाध्यक्ष तुषार माने , शहराध्यक्ष फिरोज मनेरी ,उपाध्यक्ष काशिनाथ ढोले ,उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते विलास पाटील सर, उकळे सर व सुरेश डांगे, रवीप्रकाश साबळे ,प्रसाद खडतरे , सोशल मीडिया समन्वय दत्तात्रय देशमुख आदी उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button