पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर (युवापर्व) : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागकडील सन २०२३-२०२४ वर्षा मध्ये जिल्हा परिषद उपकर योजनेमधून वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. यासाठी पात्र लाभार्थींनी २५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एल. एल. नरळे यांनी केले आहे.
आर्थिक दृष्टया मागासलेल्या शेतमजुर व शेतकऱ्यांना ७५ % अनुदानावर ४ शेळ्या व १ बोकड वाटप करणे. तसेच ५०% अनुदानावर पशुपालकांना मिल्कीग मशिन पुरवणे.वरील योजनांसाठी पात्र लाभार्थींकडुन अर्ज मागविण्यात येत असून – सदर अर्ज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ पासुन पशुधन विकस अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तसेच पशुवैद्यकिय दवाखान्यामध्ये उपलब्ध् आहेत . तसेच जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर ( www.zpsolapur ) उपलब्ध आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०२३ आहे. तरी इच्छुक पात्र लाभार्थीनी वरील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष , कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जि. प. सोलापूर तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एल. एल. नरळे यांनी केले आहे.