सावधान…! पैसा उकळण्याचा नवा फंडा ; सोशल मीडियावरून लाखोंचा गंडा ?
फेसबुक,व्हाट्सअप वरून अश्लील व्हिडिओतून ब्लॅकमेलच्या प्रमाणात वाढ
अकलूज (युवापर्व) : फेसबुक,व्हाट्सअप,मेसेंजर सारख्या समाज माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून लाखो रुपयांचा गंडा लावण्याचा नवा ट्रेड सध्या राज्यभरात चर्चेचा विषय बनत आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील बहुतांश युवा पिढी याला बळी पडत आहे. अनोळखी महिलांचे फेक प्रोफाईल बनवून २२ ते ३५ वयोगटातील युवक पुरूषांना मित्र बनवून विडीओ काॅलद्वारे अश्लील चाळे करून संबंधितांकडून पैसा उकळण्याचा फंडा समाजमाध्यमात सध्या सुरू आहे.
अकलूज शहरासह ग्रामीण भागातील युवकांनी अशा प्रकारचे समाजमाध्यमात अनोळखी व्यक्तींचे फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास स्वीकारू नयेत. महाराष्ट्र पोलीस व सायबर सेल खात्याशी तात्काळ संपर्क साधून होणाऱ्या आर्थिक फसवणूकीस बळी पडू नये. संबंधित प्रकारातील पीडीत व्यक्तींनी घाबरू नये पोलिस प्रशासन आपल्याबरोबर आहे. अशां घटनेतील पीडीतांची नावे गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच तात्काळ नजिकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन अकलूजचे पोलिस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी केले आहे. पोलिस प्रशासनासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अशा कृत्यांवर नक्कीच आळा बसेल हे तितकेच सत्य आहे .