आपला जिल्हाआपला तालुकामहाराष्ट्रराजकारणसमाजकारण

ऊसतोड मजूर महिलांना ऊसाच्या फडात जाऊन केले साड्याचे वाटप – जिल्हाप्रमुख गणेश इंगळे

संगम : शिवेसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे ,युवा सेना सचिव वरून सरदेसाई शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवा सेना राज्य विस्तारक उत्तम आयवळे यांच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊसतोड मजूर महिलांना पंढरपूरचे उद्योगपती संदेश भैय्या सोनार यांच्या वतीने संगम येथे युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त साडी वाटप करण्यात आले.

यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांनी स्वतः चा वाढदिवस हार-तुरे ,फेटे,केक न कापता शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस तोड मजूर महिलांना साडी वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. अनावश्यक खर्च टाळून ऊसतोड मजूर महिलांना साड्या वाटून समाजिक बांधिलकी जपल्याने त्याचे कौतुक होत आहे. यावेळी संदेश सोनार ,गौरव सोनार, अनिरुद्ध सुरवशे ,प्रशांत पराडे,मोनू इंगळे,बबलु इंगळे, नाना पराडे, नवा इंगळे, विकास भुंई,सचिन इंगळे, अवि पराडे, सोनु गोडशे, कविराज पराडे, सोनु पराडे, आपा भुंई ,अविनाश भोई, प्रतिक इंगळे इत्यादी युवा सैनिक उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button