आपला तालुकाआपले शहरशैक्षणिक

महर्षी प्रशालेत भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती साजरी

अकलूज : महर्षी शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर या विद्यालयात आज मिसाईल मॅन भारतरत्न डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली   त्यांची विद्यार्थी आणिशिक्षकां प्रति आपुलकीची भावना होती एखाद्या सर्वसामान्य व्यक्तींने मोठं स्वप्न पहावं आणि ते सत्यात उतरावं याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अब्दुल कलाम गरीब कुटुंबात जन्माला आलेले कलाम यांनी भौतिकशास्त्र व एरोस्पेस या विषयाचे ज्ञान घेत राष्ट्रपती पदापर्यंत भरारी घेतली.

   या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक संजय गळीतकर यांनी अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केलं शिक्षक मनोगतामध्ये बिबीशन जाधव यांनी अब्दुल कलाम यांचा जीवनपट सांगितला सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या बाल चित्रकला स्पर्धा सन २०२२ चा पारितोषिक वितरण कार्यक्रम घेण्यात आला गट क्रमांक एक ५ वी ,६ वी या गटात प्रथम क्रमांक प्रवीण दीपक बोरकर, द्वितीय क्रमांक भूमि सिद्धेश्वर म्हमाने, तृतीय क्रमांक सिद्धी दत्तात्रय टेकाळे, तसेच गट क्रमांक दोन ७ वी,८ वी या गटात प्रथम क्रमांक अक्षता नितीन भडकुंबे, द्वितीय क्रमांक समृद्धी अरुण बाबर, तृतीय क्रमांक वैष्णवी राजेंद्र डावखरे यांनी प्राप्त केला.तसेच गट क्रमांक तीन ९ वी, १० वी या गटात प्रथम क्रमांक संस्कार दत्तात्रेय धायंजे, द्वितीय क्रमांक उमर समीर शेख ,तृतीय क्रमांक हरीश रवींद्र जगदाळे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले तिन्ही गटातील या विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन मा. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,प्रशाला कमिटी सदस्य या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच या दिनी विद्यालयात हात धुवा हा कार्यक्रम संपन्न झाला हात स्वच्छ कशा पद्धतीने धुतला पाहिजे याचेही प्रात्यक्षिक विद्यालयांमध्ये झाले .

   सदर कार्यक्रमास प्रशाला कमिटी सदस्य अनिल जाधव मुख्याध्यापक संजय गळीतकर उपमुख्याध्यापक भारत चंदनकर पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे शिक्षक प्रतिनिधी शिवाजी थोरात शिक्षिका प्रतिनिधी भाग्यश्री गुजरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वाचन दिनानिमित्त ग्रंथपाल नारायण देवकते यांनी पुस्तकांचे वाचन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केले व आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button