आपला जिल्हामहाराष्ट्रराजकारण

अकलूज-टेंभूर्णी मार्गावर युवा सेनेने ठोकले मेघा कंपनीस टाळे

संगम (युवापर्व) : शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके यांच्या मार्गदर्शनाखाली, युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे,युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू पराडे-पाटील ,युवा सेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेवरे या गावात मेघा इंजिनियरिंग कंपनीस टाळे ठोकून सदरील खडतर रस्त्याबद्दल निषेध व्यक्त केला.

यावेळी बोलताना शिवसेना प्रवक्ते लक्ष्मण हाके म्हणाले की अकलूज टेंभुर्णी रोड चे काम मेघा कंपनीने घेतलेले असून ते काम संगम आणि शेवरे या गावा च्या हद्दीमध्ये खूप महिने झाले रस्त्याचे काम रखडलेले आहे. या रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे अपघाताचे मोठ्या प्रमाण वाढलेले आहे. खराब रस्ता असल्यामुळे परिसरात आजूबाजूला धुळीचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे आजूबाजूला असणारी पिके शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे म्हणाले की रस्ताचे काम लवकरात लवकर चालू करावे या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीने आज आम्ही टाळे ठोकले आहे. टाळे ठोकल्यानंतर मेघा इंजिनियरिंग कंपनीने दहा दिवसात काम चालू करण्याचे आश्वासन दिले .

यावेळी विरेंद्र वाघमारे,महादेव बंडगर, अमोल जगदाळे, विठ्ठल आबा मस्के,राहुल चव्हाण आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच या आंदोलनास युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू पराडे-पाटील ,सागर इंगळे,अनिल बंदपट्टे,कल्याण इंगळे,नरा इंगळे, विनोद पराडे,गणेश पराडे,अभय मिटकल,धनाजी सुरवसे,राहुल मस्के,लक्ष्मण मस्के, गणेश काळे,शिवाजी मस्के,युवराज पवार,जगदीश मस्के, विठ्ठल मस्के, गणेश साळुंखे,कुबेर मस्के,दिलीप काळे,अण्णा मस्के,बंडू मस्के, वामन मस्के,राहुल सुतार, कैरव महाडिक,अविनाश भोई,सिद्धू गायकवाड इत्यादी युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button