इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथे वंचित बहुजन आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न
इंदापूर (युवापर्व) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲड. बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर जिल्हा प्रभारी प्रा. किसन चव्हाण यांच्या आदेशाने गाव तिथे शाखा अंतर्गत चाकाटी ता. इंदापूर या ठिकाणी शाखा उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न. यावेळी भारत मुक्ती मोर्चा चे इंदापूर तालुका नेते संतोष मिसाळ यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी पुणे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष राज कुमार, उपाध्यक्ष सतीश साळवे, महासचिव निलेश वामणे, महासचिव मंगलदास निकाळजे, संपर्क प्रमुख ॲड वैभव कांबळे, संघटक साईनाथ लोंढे, प्रसिध्दी प्रमुख रेवण वेताळ, सहसचिव गोविंद कांबळे, इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज साबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष राज कुमार, महासचिव निलेश वामणे, उपाध्यक्ष सतीश साळवे, महासचिव मंगलदास निकाळजे संतोष मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी इंदापूर तालुका महासचिव गौतम कांबळे, प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे, संजय धिमधीमे, राजेंद्र जगताप, पिनेल चव्हाण, संतोष चव्हाण, विश्वास लोंढे, विनय दमोदरे, अतुल घोडके, चाकाटी शाखा प्रमुख कांतीलाल जाधव, शाखा अध्यक्ष मारुती घोडके, साहेबराव घोडके, दतु मिसाळ, लक्ष्मण माने, आनंद घोडके, हनुमंत सातपुते, किरण घोडके, अशोक निकम, समाधान घोडके, गणेश कांबळे, दिपक मिसाळ, संतोष घोडके, उमाजी जाधव, बापु खरात, पिंटु तिकुटे सह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.