ग्रामीणमहाराष्ट्रराजकारणसामाजिक
वडले येथे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन
युवापर्व (फलटण) : वडले ता.फलटण येथे माढा मतदारसंघाचे विकासभिमुख खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा खा. नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी युवा नेते अभिजीत नाईक-निंबाळकर ,जयकुमार शिंदे ,भाजप तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, वडले गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते पोपटराव सोनवलकर, किरण लाळगे, दादा खवळे उपस्थित होते.
यावेळी वडले गावामध्ये केंद्रीय जलजीवन मिशन योजनेतून १ कोटी ३१ लाख , वडले ते विडणी रस्ता ३ कोटी ५१ लाख , जिल्हा परिषद शाळा भूमिपूजन ९.५० लाख, स्मशानभूमी दुरूस्ती ३.५०, खासदार फंडातून स्ट्रीट लाईटसाठी १.२० लाख अशां विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला.