आपले शहरआरोग्य

प्लास्टिक विक्रेत्यांवर अकलूज नगर परिषदेची धडक कारवाई

अकलुज (युवापर्व) : सध्या अकलूज शहरात विविध सण समारंभ साजरे होत असून अकलूज शहर हे मोठी बाजारपेठ असल्याने सध्या आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरीक खरेदी साठी मोठ्या प्रमाणात शहरात येत आहेत. त्या अनुषंगाने शहरात मोठ्या प्रमाणात एकल वापर प्लास्टिकचा वापर होत आहे. त्यामुळे आज दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी बाजारपेठेतील एका दुकानावर अचानकपणे अकलूज नगरपरिषद आरोग्य विभाग व अतिक्रमण विभाग यांच्यातर्फे कारवाई करण्यात येऊन पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

तरी शहरातील सर्व उत्पादक,विक्रेते,आस्थापना यांना अकलूज नगरपरिषद वतीने सूचित करण्यात येते की,एकल प्लास्टिक वापर बंद असल्याने ते वापरू नये.अन्यथा नगर परिषद आपणावर दंड, जप्ती तसेच आस्थापना सील करणे या प्रकारची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे येणाऱ्या विविध सणासुदीच्या दिवसात नगरपरिषद हद्दीत थर्माकोल, प्लास्टिक हँडल बॅग, सजावटीचे थर्माकोल इत्यादी गोष्टींवर बंदी घालण्यात आलेली आहे. शहरातील सर्व नागरिक,मॉल,हातगाडे,फळ विक्रेते,दुकानदार, स्वीट होम मार्ट,सर्व आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकचा वापर करू नये व होणारी कारवाई टाळावी. सर्व नागरिकांनी यापुढे होणारे सण समारंभ ,उत्सव हे पर्यावरण पूरक साजरे करावे, असे आवाहन मुख्याधिकारी दयानंद गोरे साहेब यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button