Uncategorized

गोविंद वृद्धाश्रमास स्नेहभोजन देत स्वरांजली हिचा वाढदिवस साजरा

माळशिरस(युवापर्व) : माळशिरस तालुक्यातील गोरडवाडीची लेक कु. स्वरांजली कर्णवर हीचे सगळे वाढदिवस अनाथाश्रम,वृध्दाश्रम,आदिवासी मुलांमध्ये साजरे केले आहे.१ मे महाराष्ट्र दिनी जन्मलेली कु.स्वरांजली हिचा ७ वा वाढदिवस गोविंद वृध्दाश्रम टेंभुर्णी येथे साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमातील वृध्दांना स्नेहभोजन देण्यात आले.

या कार्यक्रमास गोविंद वृध्दाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ महाराज देशमुख, सोमनाथ कर्णवर पाटील ( सहायक पोलिस निरीक्षक ठाणे शहर), रीमा कर्णवर पाटील, सिविल इंजिनिअर अमोल कर्णवर पाटील, विजया कर्णवर पाटील, नुकतेच राज्यसेवेतून निवड झालेले प्रदीप गोरड, डॉ.नितीन देवकाते,डॉ.सारिका देवकाते,स्वाती ठवरे,जयश्री ठवरे,अजित जाधव उपस्थित होते.

यापूर्वी स्वरांजलीचा वाढदिवस हा अनाथाश्रम मालेगाव जि.नाशिक,अदिवासी शाळा श्रीगोंदा जि.अहमदनगर, आदिवासी मुलामध्ये कोरोना काळात भिवंडी या ठिकाणी मजूर लोकांना फळे वाटून, मुलींची अनाथाश्रम शाळा आणगाव ता.भिवंडी,पालवी अनाथ आश्रम पंढरपूर या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे.

युवापर्व न्यूज

स्वतंत्रता,समता व बंधुता विचारांचे समाजमाध्यम...,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button