“भंन्ते ज्ञानज्योती” यांच्या धम्म यात्रेचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
अकलूज : सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत भिमाकोरेगांव ते पंढरपूर असा प्रवास करणाऱ्या धम्मयात्रा पदयात्रेचे आज सोमवार दिनांक 4 जुलै 2022 रोजी सायंकाळी ठीक पाच सोलापूर जिल्ह्यात वाजता आगमन झाले. यानिमित्त जिल्ह्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या वतीने पुष्पवृष्टी सह त्याचे भव्य स्वागत करण्यात आले . २६ जून पासून निघालेली ही पदयात्रा गुरूवार ७ जूलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तेथेच डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पंढरपूर येथे या पदयात्रेचा समारोप होणार आहे.

दरम्यान गांधी चौकात स्वागत केल्यानंतर ही पदयात्रा आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सारनाथ बुद्ध विहार या ठिकाणी पोहोचली. या ठिकाणी परिसरातील बौद्ध बांधवांच्या वतीने सर्व भिक्खू संघासह यात्रेत सहभागी असणाऱ्या सर्व धम्म बांधवांचे जोरदार स्वागत करण्यात आले त्यानंतर भंतेजींनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्म विचारांच्या अनुषंगाने धम्मदेशना केली . यावेळी त्यांनी या धम्मयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. धम्मयात्रेचा आजचा मुक्काम अकलूज येथेच असून सकाळी ठीक सहा वाजता ते पंढरपूरच्या दिशेने खंडाळी मार्गे रवाना होणार आहेत. यावेळी परिसरातील बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारनाथ बुद्ध विहार च्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
Great post.
THANKS