माळशिरस शहर व्यापारी युनियन पदाधिकार्यांच्या निवडी
माळशिरस(प्रतिनिधी) : माळशिरस नगरविकास युवक आघाडीच्या वतीने माळशिरस शहर व्यापारी युनियन नव्याने स्थापन करण्यात आले आहे. या व्यापारी युनियनच्या अध्यक्षपदी हसन मुलाणी तर उपाध्यक्षपदी तौफिक बिदरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच शहर व्यापारी युनियनच्या सचिवपदी आरिफ काझी,खजिनदार सलमान तांबोळी,सहसचिव लखन मनेरी,संघटक अन्सारभैया इनामदार,संपर्क प्रमुख फिरोज मणेरी,अल्फाज तांबोळी आदींची निवड करण्यात आली आहे.
या व्यापारी युनियनच्या कायदेशीर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून ॲड.साजिद शेख, शकिल मुलाणी,अजिम मुलाणी,अमररजा शेख,अन्सार शेख, अन्वर बिदरे,आयात मणेरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आले. यावेळी व्यापरी युनियनच्या नुतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना अॅड.दादासाहेब पांढरे-पाटील,
रशिद भाई शेख,नगरसेवक मा.कैलास वामन,अजीम मुलाणी,मलिक इनामदार,अशपाक शेख, शहाबाज शेख,अनिस मुजावर, रियाज तांबोळी,अशोक जाधव आदी उपस्थित होते.