साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थांना वह्या व खाऊचे वाटप
अकलुज (युवापर्व) : साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीचे औचित्य साधून अकलूज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.संग्रामसिंह मोहिते-पाटील व माजी जि. प. सदस्य तथा रा.काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा अध्यक्ष मा. बाळासाहेब धाइंजे यांच्या उपस्थितीत विजय वस्तीगृह येथे लहान मुलाना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले.
हा समाजपयोगी उपक्रम सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे युवक उपाध्यक्ष मा. सज्जन लोखंडे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी श. प. पक्षाचे विधानसभा कार्याध्यक्ष मोहसीन शेख , युवक ता.कार्याध्यक्ष अमोल माने, नाजिरहुसेन मोहोळकर,अविनाश अवघडे, दादासाहेब गालफाडे दत्तात्रय वाघमारे, तय्यब मुलाणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते आण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.