आपला जिल्हाआपला तालुकाकृषीविषयक
ऐन बैल पोळा सणांवर दुष्काळाचं सावट

करमाळा(युवापर्व) : शेतकर्यांचा सण म्हणून ओळख असलेला सण म्हणजे बैल पोळा. या सणांवर दुष्काळाचं सावट पडल्याचे चित्र दिसून येत आहे. बाजारात सणा साठी उपलब्ध असलेल्या साहित्यालाही म्हणावं अशी मागणी नाही. त्यामध्ये पाऊस वेळेवर न झाल्यामुळे या सणांवर दुष्काळाचं सावट निर्माण झाले आहे. अशा या बिकट परिस्थितीत शेतकरी सापडला आहे.

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केली होती मात्र पाऊसा अभावी पीके पण करपून गेली आहे. प्रत्येक “आस्मानी सुल्तानी” परिस्थितीवर मात करणारा या बळीराजाच्या वाट्याला प्रत्येकदा निराशाच पदरी येत आहे.