आपला जिल्हाग्रामीण
पिंपळनेर येथे रमजान ईद निमित्त सामूहिक नमाज पठाण

टेंभूर्णी (युवापर्व) : माढा तालुक्यातील पिंपळनेर मध्ये ईद ऊल फितर अर्थात रमजान ईद चा सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळनेर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी ईदगाह येथे सकाळी ९.०० वा.च्या सुमारास सामूहिक नमाजचे आयोजन सालाबादप्रमाणे करण्यात आले. यावेळी मौलाना साकीब यांच्यामागे ही नमाज पठण करण्यात आली.

या ईदच्या नमाज नंतर प्रत्येक मुस्लिम बांधव एकमेकांस आलिंगन करत ” ईद मुबारक ” अशी शुभेच्छा देत होते.तसेच यावेळी अलाउद्दीन मुलाणी,जब्बार तंबोली, आदम जकाते,जिलानी मुलाणी, दादा मुलाणी,याकूब सय्यद,राजू तंबोली,उमर आतार यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य मुस्लिम समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.