अकलुज शहरात पावसाची जोरदार हजेरी; शेतकऱ्यांतून समाधान

अकलुज (युवापर्व) : राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण जाहीर होण्याच्या मार्गावर असताना आज अकलूज शहरात बर्याच दिवसानंतर पावसाचे आगमन झाल्याने बळीराजासह व्यावसायिक ,व्यापारी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अकलूज शहर हे माळशिरस तालुक्यातील एकमेव मोठी बाजारपेठ असून पावसाच्या प्रतीक्षेमुळे व्यापार,व्यवसायासह दळणवळण मंदावला होता. वरूणराजाच्या जोरदार आगमनानंतर बाजारपेठेस “अच्छे दिन” येतील अशी अपेक्षा केली जात आहे. खरीप हंगामाचे अंतिम टप्प्यात कापनी करण्याच्या वेळेप्रसंगी पावसाचे दमदार हजेरीने बारमाही ऊस उत्पादक शेतकरी वर्गाचा आनंद द्विगुणी झाला आहे.

सोलापूर जिल्ह्याचा पर्जन्यमानाचा विचार केल्याच येथे राज्याच्या सरासरी कमी प्रमाणात पाऊस पडतो. माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यात प्रामुख्याने ऊस उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून याचा बराच फायदा त्यांना होणार आहे. तालुक्यात दुग्धव्यवसायांवर बर्याच कुटुंबाचे उदरनिर्वाह असून गुरांना चारा,पाण्याची टंचाई सारखे उद्भवणारे प्रश्न तुर्तास मार्गी लागण्याची शक्यता आहे.